प्रिय माणूस,
हे पत्र फक्त तुझ्यासाठी.
पत्र लिहिण्याचं कारण आसं, कि मी तुझ्या समोर बोललेलं कधी तुला समजलच नाही, म्हणून म्हणलं पत्राद्वारेच कळवावे.
खरं सांगायचं झालं तर मला तुझ्याकडून कधीच वेगळी काही अपेक्षा न्हवतीच. मी जशी आहे तशीच खुष आहे, पण तोपर्यंतच, जोपर्यंत तू माझा जीव घेशील असा विचार मनात येत नाही. असो, मला कळतंय मी थेट मुद्द्यालाच हात घालतीये. पण मला तुला खूप काही सांगायचंय. तर, मग मी वेळ घेऊनच सांगेल अपेक्षा करते कि तू हे पत्र पूर्ण वाचशील.
तर मी सुरुवात करते माझ्या जन्मापासून. खरं सांगायचं झालं तर मला आठवत पण नाहीये कि मला जन्म देणारे माझे आई – वडील कोण आहेत ? पण त्यात काय विशेष नाहीये. बऱ्याच जणांसोबत असं घडतं. माझ्याच ओळखीत खुपसारे आहेत. तसं मी एकटीपण रहात नाही. तुझ्या कृपेने माझ्यासारखेच दिसणारे बरेच जण माझ्यासोबत होते आणि मला चांगलंसुद्धा वाटायचं. वाटायचं, कि मी एकटीच नाहीये जिच्यावर असे दुःख ओढावलेत. अरे… मी मुद्दा भरकटतीये, माफ कर.
आम्हाला तू वेळोवेळी चारा आणि पाणी देयचा, बाहेर फिरायला म्हणुन रानातही नेयचास,तू खाल्लेलं खरकटं सांडपाणी आमच्यासमोर फेकायचास. त्यामुळे आमचं पोट भरायचं. तेच महत्वाचं होतं तेव्हा किंवा आजुनही आहे.
मला चांगलच आठवतंय कि तू मला खूप साऱ्या माणसांच्या गर्दीमधून तुझ्या गाडीवर बसून आणलं होतस. माझ छानसं नावही ठेवलं होतं तू. तसं मला माझं नावही आवडायचं. त्या नावामुळे बाकिचे खुप जळायचे. तशी मी एकुलती एकच होते ना. असो, मला ना… गाडीवर परत बसायची खुप ईच्छा होती. पण…. पण त्या दिवसापासून ती ईच्छासुद्धा नाहीशी झाली. आता तर तुझ्या गाडीकडे बघावसही वाटत नाही मला.
तुला आठवतंय का? मी बरीच मोठी झाली होते…. आणि तेव्हा तू एक उंच, पिळदार शिंगांचा, ऐटीत चालणारा, जाडासा, आमच्यासारखाच दिसणाऱ्याला आणलं होतं. त्याला बघून तर मनात भलतच काहीतरी झालं. व्यवस्थित आठवत नाहीये पण तू त्याच्या खाली हात लावून काहीतरी केलं आणि माझ्या मागे बांधून टाकलस. मला कळलंच नाही काय चाललंय ? पण नंतर मात्र त्रास नक्कीच झाला होता. जसे दिवस पुढे जातील तसं – तसं माझं पोट वाढत चालल होतं. काही खावंसं वाटत न्हवतं. उड्याही मारता येत न्हवत्या. जोरात चालले तरी पोटात दुखायचं. त्या रात्री, वरून पाणी पडत असल्यामुळे तू आम्हाला घरात बांधलस आणि अचानक माझ्या पोटात खुप जास्त दुखायला लागलं. मला खूप त्रास होत होता. मला कळत न्हवतं कि मी काय करू ? मी जिवाच्या आकांताने ओरडत होते पण तू माझ्याकडे लक्ष न देताच आत निघून गेलास. माझ्याकडून आपोआप माझ्या पोटावर जोर पडला आणि माझ्या डोळ्यावर माझा विश्वासच बसत न्हवता. मी एका पिल्लाला जन्म दिला होता. अगदी माझ्यासारखा दिसत होता तो. त्या रात्री माझ्या डोळ्यांतुन तर आश्रूच थांबत न्हवते …
एके दिवशी माझं पिल्लू दूध पीत असताना अचानक तू माझ्या पिल्लाला बाजूला ओढून काढलंस. आणि माझ्याच समोर बांधून ठेवलस. पिल्लू गं माझं ते…. दूध पीत होता ना …..? खुप राग येत होता तुझा. पण करणार तरी काय ? माझ्या पिल्लूपेक्षा तुलाच दूधाची हाव होती. मी तर माझ्या पायांनी प्रतिकार सुद्धा केला होता पण तू मारलेल्या काठी च्या फटक्यांसमोर मी काय करू शकणार होते. मी माझ्या पिल्लू कडे बघतच उभी राहिले. खाल्लेल्या फटक्यांचे वेदना सहन करत.
तुझ्या रोजच्या अशा वागणुकीमुळे मी आता तुला गुपचूप दूध हिसकाउन पण देत होते. कारण थोडा का होईना, माझं पिल्लू पीत तरी होतं, नाहीतर तू तेही बंद करशील तुझा काय भरोसा ? माणसांचा स्वभाव कोणाला कधी ओळखता आलाय का ? त्या दिवशी तुझी बायको सुद्धा त्याच्या बाळाला दूध पाजत बसली होती आणि तू मागून आलास. मी तर घाबरलेच होते. तू तिच्या पण बाळाला लांब करशील म्हणुन. मी तरी तिला सावध करण्यासाठी ओरडत होते कि, “तू आला आहेस बाळाला संभाळ. दूध लपवुन ठेव नाहीतर तो काढून घेईल.” आणि झालं पण तसच. त्याने बाळाला उचललंच, पण त्याला खेळवून तुझ्या हातात परत दिलं. मला काही समजलच नाही. रानात जाण्यासाठी तू येऊन माझ्या पिल्लूला सोडलं. ते येऊन पटपट दूध पियू लागलं. मी तर तशीच शांत उभी होते. कारण त्यादिवशी कळून चुकलं कि जबरदस्ती दूध माझच काढलं जात होतं. असो.
त्यानंतर काही दिवसांनी, तू खूप सजून वगैरे बाहेर आलास. मी जरा आजूबाजूला बघितलं. आजून बऱ्याच लोकांनी छान छान कपडे घातली होती. तू तर अगदी तसाच दिसत होता, एकदम आपल्या पहिल्या भेटी सारखा. मला पण चांगलं वाटत होतं. माहीत नाही का ? पण आज तू माझ्या पिल्लूला तुझ्या गाडीवर बसवत होतास. खरंतर मला बसायचं होतं. पण मी काय आणि माझं पिल्लू काय दोन्ही एकच. तसाही तो कधी बसला न्हवता त्याला आनंदात बघून मला पण बरं वाटलं. मला ना खरच आत्तापर्यंत तुझा स्वभावच कळला नाही बघ. कधी आम्हाला मारतोस, कधी लाडपन करतोस. तू कधी काय करशील त्याचा काही नेम नाही बाबा. पण असो, माझं पिल्लू एवढा मोठ्ठा झाला होता कि तूला धड उचलता पण येत न्हवतं. मला तर हासूच आलं. तू पिल्लूला पुढे घेऊन गेलास आणि मी तुझ्या बाई आणि बाळा बरोबर लोकांच्या गर्दीमधून येयला लागले.
लहानपणी तू मला ज्या रस्त्याने घेऊन आला होतास त्याच रस्त्याने आम्ही तुझ्याकडे येत होतो. बघून खूपच बरं वाटलं. छान दुकाने दिसत होती. कोणाचा तरी मोठ्या भोंग्यावर ओरडल्यासारखा आवाज येत होता. लहान मुले खेळणे खेळत होती. तर कोणी रंग उधळत होती. हे सगळं बघत असताना माझं लक्ष माझ्या पिल्लुकडे गेले. तू आणि तुझ्यासोबत आजून बरेच माणसं कोणाच्या तरी घराच्या समोर हात जोडून थांबले होते. तुम्ही सगळे माझ्या पिल्लुच्या अवतीभोवती का थांबले होते हे मला तेव्हा कळालंच नाही. तेवढ्यात माझ्या अंगावर कोणीतरी रंग उडवला. मला तुझ्या बाई ने तिथेच बांधून ठेवलं आणि स्वतः गेली त्याच्या बाळासोबत, त्याला खाऊ घेयला. मी बघितलं कि माझ्या पिल्लुच्या अंगावर तुझ्या सोबत असणाऱ्या माणसाने लाल रंग उडवला. इतकी सगळी गर्दी आणि माणसं पाहून माझं पिल्लू आधीच घाबरला होता त्यात तुम्ही जोरात ओरडला तो आणखीनच दचकला. मला त्याची काळजी वाटत होती मी त्याच्याकडे येतच होते कि मला बांधून ठेवल्यामुळे मला तिथून हलता पण आलं नाही. त्याच्या अंगावर तुम्ही पाणी टाकलं. मला अजिब्बात आवडलं नाही आणि तू पण काही बोलला नाहीस. मला वाटलं तू काहीतरी बोलशील त्यांना. पण तू तसाच उभा होता. कसले तरी आवाज करत. सगळ्यांचा आवाज खूपच वाढू लागला. माझ्या पिल्लुने अंग झटकले. ज्या माणसाने पाणी टाकलं होतं त्याने सुरा आणून माझ्या पिल्लू च्या मानेवर ठेवलं. मी इथून सुटायचा प्रयत्न करत होते. तुला हाक मारत होते… “आडव त्याला आडव.. माझ्या पिल्लूला तो मारून टाकेल…” पण तू लक्षच नाही दिलस. मी जोरजोरात ओरडतीये, “मॅ…. मॅ …..” माझं पिल्लू पण ओरडायला लागला “मॅ…. मॅ….मे….” तो हळू हळू-हळू सुरा त्याच्या गळ्यावरून फिरवू लागला….. माझ्या पील्लुचा आवाज नाहिसा होत चालला होता. “मॅ… मा…. माँ…..” बघता बघता माझ्या पिल्लूच तोंड त्याच्या शरीरापासून वेगळं केलं गेलं. मी जागेवरच स्तब्ध थांबले दोरी सुटली होती पण मी आता जाणार तरी कुठे होते ? मी तिथेच थांबले होते माझ्या पिल्लूकडे बघत. तोंड नसलेल्या शरीराकडे बघत.
बऱ्याच दिवसांनी मला माझ्या पहिल्या पिल्लुची आठवण आली होती.
त्या रात्री मला नेहमीसारखं घराबाहेर बांधून ठेवलं होतं. तुझी बायको आली. तिच्या कमरेवर बाळाला घेऊन. नेहमीसारखच तुमचं खाऊन झाल्यावर उरलेलं सांडपाणी टाकायला. मी तिच्या बाळाकडे एकटक बघत होते. बाळपण माझ्याकडे बघत होता. अन् माझ्याकडे बघून तो हसला. त्याला बघुन टचकन डोळ्यात पाणी आलं. मी आपोआप सावरले गेले. सांडलेले खरकटं खायला पुढे गेले आणि त्या खरकट्यात मला माझा पिल्लू दिसला. मी जागेवरच गार पडले.
मी आजपण तिथेच आहे. तशीच, बांधलेली. आजून काही पिल्लांना जन्म देत. तुला दूध हिसकावून घेऊन देत. माझ्या पिल्लांचा जीव तुझ्या ताटात सजवून देत.
मला माफ कर मी जरा जास्तच बोलले असेल तर. पण मला वाटतंय कि तेव्हढ्यासाठीच तू मला रोज चारा देतोस. आधून मधून रानावर नेतोस. असो, मी तुला हेच सांगायला पत्र लिहिलं होतं कि,
मला आता सवय झालीये !
जमल्यास कळावे.
तुझीच, “चंद्रा.”
तुझ्या भाषेत एक बकरी.
Finally the truth is spoken. Most of the readers must be calling themselves feminists, peace makers and open minded but this single letter has changed their perspective to look at themselves as they are the one supporting hypocrisy by supporting such acts. Thanks a lot Rushabh for pointing out the commen hypocrite hidden inside everyone
Ammazing, very heart touching…
Finally the truth is no longer hidden behind the bars of culture, religion and tradition. Most of the readers must be calling themselves feminists, peace makers and open minded while on the other side they are the reason these things happen with animals. Thank you Rushabh for pointing out the common hypocrite hidden inside everyone.
ऋषभ अप्रतिम पत्र…..छान लिहिलं आहेस,आवडलं…भावुक केलंस पत्राच्या शेवटी
Khupch sundar !
Kharach kasa kai suchat evdha chan !
Khuppp Kamal
खुप छान शब्दांमध्ये विषय मांडला अहे , असच लोहित रहा पुढ़िल वाटचलीसठी खूप खूप शुभेच्छा!!!
Rushabh kharacha khup mast ,mhanje tu uttam lihitosacha pan ha vichar patra dware lokansamor thevn aasa vichar karnacha mulinkhup unique aahe… It’s a truth tyanna bolta yet nasla teri bhavna aahet tyanna he tuzha patratun khup chan kalal…aani btw aas mhantat ke lekhakala lihitana patra jagun lihava lagta!! Tu he jaglas n he sagla,tuzha he patra lihitanacha experience nakki share kar !
Rushabh khup mast lihilayes…Tu chanacha lihitos pan muli ha vichar patratun mandana aas vichar karna he khip unique aahe…Mala prachanda aawdla tu ha vishay niwadlas..tyanna bola yet nasla mhanun kai zhala feelings ter aastat aani te tu khup uttam padhatine mandla…aani aas mhantat ke lekhakala likha kartana te patra jagav lagt,Tu he he sagla jaglas n?? Tuzha patra lihitanacha experience nakki share kar. Best of luck for your next work
Kammaalll!!
Thank you all and please supporting me like that Love you all …… and keep following clubture for more unique content ….. Thanks again
Very heart touching….
Very heart touching
Very heart touching….
Khup jasti sundar…. Hich reality ahe ani Tu aaj he ya letter cha nimittani saglyansamor anlas. Amazing and heart touching ❤️❤️
ऋष्या कमाल रे
Wow! Now this is what I call a letter which actually made me speechless but gave me courage to speak up. Well done Rushabh !!
“Truth is beautiful” हे नेहमीच ऐकत आले. आज ते जाणवलं. हे पत्र संपूर्ण मानव जातीने वाचलंच पाहिजे. शांत झोपेत माणूस सध्या सुखी आहे, पण त्याला उठवणं खूप महत्त्वाचं आहे. सत्य त्याने बघितलंच पाहिजे. तुझे हे विचार तू नक्कीच लोकांपर्यंत पोचवशील. असेच सुंदर संदेश देत रहा. Peace.