पत्र - 2 Archives - Clubture
पत्र – 8
प्रिय टिव्ही,
खूप दिवसांपासून तुला एक गोष्ट सांगयची होती,माझं तुझ्यावर पूर्वी सारखं प्रेम उरलेलं नाहीये आणि याचं कारण माझ्या आयुष्यात आता दुसरं कोणीतरी आलेलं आहे.मला माहित आहे तुला माझ्या पासून दूर जायची इच्छा नाहीये, पण मला आता जावं लागेल पण आपल्या आठवणी नेहमी माझ्या जवळ राहतील. मला आठवतंय आपल्या नात्याची सुरुवात दूरदर्शन पासून झाली होती.आपला जुनियर जि, आपले चालता बोलता, आपले विक्रम वेताळ, आपला शक्तिमान,आपले शनिवार रविवारचे सिनेमे मला अजूनही आठवतात.मग आपल्या नात्याला वळण आले ते केबलमुळे, दूरदर्शन सोडून बरेच चॅनल्स बघायला मिळू लागले, त्या काळात माझं तुझ्यावरचं प्रेम अधिकच वाढलं होतं.आपल्या अडचणीच्या काळात डीव्हीडी प्लेयरने पण खूप मदत केली, कधी भाड्याने कधी विकत घेतलेल्या डीव्हीडी मला अजूनही आठवत आहेत.त्या वेळी केलेल्या कष्टात आणि काटकसरीत सुद्धा एक वेगळाच आनंद होता.याचं कारण आपण एकत्र होतो, आपल्या नात्यातला सर्वात सुंदर काळ म्हणजे जेव्हा तुला Tata sky ची जोड मिळाली आणि आपल्या नात्यात कशाचीच उणीव भासली नाही.दिवस रात्र मी तुझ्याबरोबर घालवू लागलो,आई वडिलांचा विरोध होता आपल्या नात्याला तरी सुद्धा मी तुझ्याशी नातं टिकवायचं मनाशी पक्क केलं होतं, पण या सगळ्यात मला एक गोष्ट जाणवली ते म्हणजे तू माझ्या आवडीनिवडीचा कधीच विचार केला नाहीस आणि मग माझ्या आयुष्यात नेटफ्लिक्स आली. मला काय हवं नको याची सगळी माहिती आहे नेटफ्लिक्सला.आमचं प्रेम वन साईडेड नाहीये, जेवढा विचार मी नेटफ्लिक्सचा करतो तेवढाच विचार नेटफ्लिक्स माझा करते,माझ्या आवडीच्या गोष्टींचा रेकॉर्ड ती ठेवते. Money heist, stranger Things , Narcos मला हवं तेव्हा हवं तिथून बघायला मिळतं.जेवढा यूजर फ्रेंडलीनेस आमच्या नात्यात आहे तेवढा आपल्या नात्यात कधीच येऊ शकला नसता.पण एक मात्र नक्की आपल्या सगळ्या आठवणी मी जपून ठेवलेल्या आहेत आणि त्या माझ्यासाठी नेहमीच प्रियं असतील.शक्य असल्यास मला माफ कर.
तुझाच,
एक व्ह्यअर.
Abhishek Ranade
Abhishek Ranade is Writer, Actor and Director from Sir Parshurambhau College Pune. He has won several Awards in Inter-Collegiate Drama Competitions.
The post पत्र – 8 appeared first on Clubture.
पत्र – 7
प्रिय मलाव्य,
मलाव्य म्हणजे “महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्त्व”. एक अशी व्यक्ती जिने जनमानसाला अक्षरशः वेड लावले. प्रचंड लोकसमुदायाला कधी खळखळून हसवले, कधी कोपरखळ्या मारल्या, क्वचित कधी रडवले आणि अखंडपणे रिझवले. त्या व्यक्तीने अवघ्या महाराष्ट्राच्या ह्रदयावर अधिराज्य गाजवले, तिच्या शब्दांची मोहिनी आजही आबालवृद्धांना भुरळ घालते व ते भारावलेपण आज झिरपत झिरपत आमच्या पिढीपर्यंत येऊन पोचलेलं आहे. आता ही कोण ‘असामी’ म्हणून विचारात पडू नका, ही आमच्या जवळची, तरीही अनन्यसाधारण असलेली व्यक्ती तुम्हीच आहात, पु.लं!
१२ जून २००० ला तुम्ही गेलात तेव्हा मी बरोबर एका वर्षाची होते. ती हळहळ, कातरता, आक्रंदन, मळभ, एकटेपण-पोकळी आणि वातावरणात भरून आलेलं आषाढघनासारखं पुलंप्रेम हे समजण्याची, त्यात सामील होण्याची माझी क्षमताच नव्हती. पुढे मी तुमचं साहित्य वाचू लागल्यावर एखाद्या भक्ताप्रमाणे तुमच्या एका दर्शनासाठी गर्दीत घुसायला, तुमची शक्य ती – शक्य तिथे जाऊन भाषणं ऐकायला, तुम्हाला पत्र पाठवून पत्रोत्तराची चातकासारखी वाट पहायला, सध्याच्या घटनांवर तुमची खुमासदार प्रतिक्रिया ऐकायला मला खूप आवडलं असतं, पण त्यासाठी तुम्ही इथे नव्हताच. मग एक चाहती म्हणून माझा संवाद एकतर्फीच राहिला का? खरं तर नाही. तुमची पुस्तकं, लेख, भाषणं, कथाकथनं या सर्वांतून तुम्हीच तर बोलत होतात!
अशाप्रकारे ’पायाभूत’ म्हणता येईल एवढं वाचन झाल्यावर तुमचे काही गंभीर लेख, ज्यांचं कधीच तुम्ही प्रकटवाचन केलं नाही असे काही पुस्तकांतील लेख हेही थोडं थोडं वाचलं. त्याच काळात समांतरपणे सुनीताबाईंची कवितांजली, चित्रमय स्वगत ह्यांची पारायणं झाली. मंगला गोडबोलेंचं ’सुनीताबाई’ वाचलं; ते खूप आवडलं, मग ’आहे मनोहर तरी..’ वाचलं आणि ते अगदीच जवळचं पुस्तक होऊन गेलं. या सर्वांतून तुमची वैयक्तिक माहिती कळू लागली आणि तुम्ही व सुनीताबाई कधी न भेटता, कधी प्रत्यक्ष न बघताही माझी खूप आवडीची माणसं होऊन गेलात! खरं तर मी घरातल्या कोणाला समोर बसवून सगळे प्रश्न एकदमच का विचारून टाकले नाहीत, माहित नाही….कधी करावंसं वाटलंच नाही. ते माझ्यापरीने हळू हळू शोधत जाणच मला आवडणार होतं, कारण माझा तुमच्याप्रति प्रवास काहीसा तसाच तर होता!
तुम्हीच लिहिलं आहे की ’ लेखक एकदा परिक्षेला लागला की संपला!’! गंमत म्हणजे तुमचं कसलंही लिखाण आम्हाला कधीच पाठ्यपुस्तकात नव्हतं. याचा जसा खेद आहे तसाच “पंतांना कुशाभाऊंनंतर कोण भेटायला आले?”, ” वजनाचा मार्ग भलत्याच काट्यांतून जातो – संदर्भासहित स्पष्टीकरण करा” असे प्रश्न सोडवावे लागले नाहित याचा आनंदही आहे.
प्रत्येक लेखक त्याच्या वाचकासाठी वेगळा असला पाहिजे…खरं तर मी तुम्हाला पुलं आजोबा म्हटलं पाहिजे पण तुमच्या लेखनातून जे तुम्ही भेटलात ते काळाची कसलीही खूण न उमटलेले, चिरतरूण असे! आमच्या मागच्या, त्यामागच्या पिढीने तुमचा सगळा प्रवास पाहिला, तुमच्यासारख्या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाच्या सहवासाचे, दर्शनाचे अमृतकण त्यांनी अनुभवले…त्याला मुकल्याबद्दल मी स्वतःला दोष देण्याखेरीज काहीच करू शकत नाही. मात्र त्या सर्व प्रवासातल्या शेवटच्या एका छोट्या तुकड्यात कुठेतरी अजाणतेपणी माझं अस्तित्व होतं याचं मला मुग्ध समाधान आहे…
– मुक्ता
Mukta Bam
Mukta Bam is a Writer, Director and Lyricist from Fergusson College. She is a Psychology Student and has won awards in Inter-Collegiate Drama Competitions. She is a trained Kathak Dancer from the age of 8.
The post पत्र – 7 appeared first on Clubture.
पत्र – 4
प्रिय माणूस ,
कसे आहात ? अर्थात हे संकट कधी जाणार या विचारात असणार. विधाता परीक्षा घेतोय आपली, आणि मला विश्वास आहे की आपण ह्या परीक्षेत नक्की उत्तीर्ण होणार. माहित नाही कुठून येतो हा विश्वास पण विश्वास असणं महत्त्वाचं.
हे जग थांबलय म्हणे, प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्ष थांबलय हे सत्य, पण तुमचं. या एवढ्या मोठ्या टाळेबंदीत सुद्धा हे जग घरात शांत पहुडलय. मग काय सकाळ, दुपार आणि कसली हो संध्याकाळ ? आणि गम्मत म्हणजे बऱ्याच लोकांना रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठण्या मागचं कारण हल्ली कळत नाहीये, पण तुम्हाला. जेव्हा ही टाळेबंदी सुरू झाली तेव्हा अनेकांना आपल्या कामाबद्दल प्रश्न पडलेला, काम कसं करणार ? ऑफिस ला जाणार कसं ? पण यावर सुद्धा उपाय म्हणजे वर्क फ्रोम होम . किती भारी , काय मग घरी बसून काम करण्याचा adventure मिळतोय ना ? आणि मुख्य गोष्ट म्हणजे घरून काम केलं की स्वतः ची एक स्पेस मिळते, आणि त्या गोष्टी च सुख काही और च असतं. चला चला आता तरी बॉस च्या नावाने बोट न मोडता काम करा, पण तुम्ही. विद्यार्थी मंडळी काय म्हणताय ? साहजिकच अश्या प्रतिकूल परिस्थिती ची सवय नाही तुम्हाला, कंटाळा तर येणारच. पण ऐकलंय xyz, abc trend काहीतरी सूरुये म्हणे , नाही चांगलय अश्या परिस्थितीत मन रमवण्यासाठी काहीतरी साधन हवं असतं, पण तुम्हाला. आणि साहजिकच सगळे जण दिवसभर घरी असल्याने सारखी सारखी भूक लागणारच. मग काय रोज नवीन नवीन मेजवानी चा बेत आखला जातोय, रोज काहीतरी नवीन चविष्ट पदार्थ बनताय, पण तुमच्याकडे. आणि या संकटकाळात सध्या सगळे वेगळ्या अंगाने जीवन जगत आहात. प्रत्येकजण आपल्या कला गुणांना वाव देतोय, कोणी आपले छंद जोपासतोय, तरी कोणी खूप दिवसांनी मिळालेला ब्रेक एन्जॉय करतोय, आणि काही जण आपल्या स्पेस मध्ये जगता येत असल्याने वेगळाच आनंद व्यक्त करताना दिसताय. पण तुम्हीच हा…
अर्थात आता तुम्हा सगळ्यांना हा प्रश्न पडला असणार की मग आम्ही काय करतोय ? आम्ही या टाळेबंदी मध्ये फक्त आमच्या घराची वाट सापडतोय. आम्ही अनवाणी पायांनी पायाचे तळवे जाळत , हातावर पोट आणि मनावर दगड ठेवून वाट तूडवतोय. लेकरांची इवले इवले पाय जळत असताना या मायभूमी ला देखील त्रास होत असणार, पण कर्माची फळं कोणाला चुकली नाहीत. जग थांबलय हे खरंय पण आमची भूक नाही ना थांबली. जग टाळेबंद झालं, सगळी जनता आपापल्या घरात कैद झाली, मात्र आम्ही रस्त्यावर आलोय. घरबसल्या सोडा आमच्या नशिबी कामच उरलं नाहीये,घरबसल्या कामाचं adventure नसेलही पण भर उन्हात भुकेने व्याकुळ असताना देखील चालत राहण्याच adventure आहे नशिबी. इमोशनल स्पेस वगैरे जाऊ द्या हो , राहण्याची स्पेस सुद्धा उरली नाहीये आमच्याकडे. हे उघड आभाळ म्हणजे आमचं छत.पण त्या छतामधून सुद्धा कधी चटके देणारं उन तर कधी जोरदार पाण्याच्या धारा सतत येत असतात. खरं सांगू , आम्हाला कोणता ट्रेण्ड नकोय फक्त एक ट्रेन हविये, मन रमवन्यासाठी नाही तर घराचं अंतर कमी करण्यासाठी एक साधन हवंय. उन्हाचे चटके, उघड आभाळ, भूक , तहान आणि ढुंगणावर दंडुके हीच काय ती आमची रोजची मेजवानी . हो मात्र एका गोष्टीचं साम्य नक्की आहे, आम्ही देखील एका वेगळ्या अंगाने जीवन जगतोय. रोज आपलं लेकरू उपाशी नाही या आनंदात जगणाऱ्या आईला मुल उपाशी निपचित पडल्याचा दुःखात बघतोय. आम्ही आमच्या पाय गुणांना वाव देतोय , घरी जाण्याचा छंद पूर्ण करू बघतोय आणि वाटेत आम्ही देखील ब्रेक घेतोय. मात्र या ब्रेक च्या सोबतीने गांडीवर पडणाऱ्या वळांच्या वेदना सहन करतोय. चालून चालून हत्तीसारखे पाय झालेत, आज काल लेकरू चॉकलेट गोळ्यांसाठी नाही तर भूक मिटवण्यासाठी दोन घासांचा हट्ट करतंय. भर उन्हात चालून आलेल्या घामानेच तहान मिटवू बघतोय.
आता तरी मान्य करा, चुकलोआहोत आपण. तुम्ही आम्ही सगळे जण शिक्षा भोगतोय. तुम्ही चूक आम्ही बरोबर किंवा तुम्हाला आनंद आम्हाला वेदना अशी काही तक्रार नाही.
फक्त हा भेद कशासाठी हा एकच प्रश्न ? भुकेला कोणता धर्म, जात किंवा पंथ नाही मग हा दूजाभाव कशासाठी ? आमच्या घरांच्या वाटा का बंद आहेत ? आपल्या कर्माची फळं हे चिमुकले जीव का भोगताय ? माणूस खाल्ल्या मिठाची चव का विसरलाय ? माणसातला माणूस का हरवलाय ? गावी परतलेले हे पाय पुन्हा शहरांकडे वळतील का ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या कडे देखील नसली तरी हे प्रश्न सोडवण्याचा बळ नक्कीच आपल्या सगळ्यांमध्ये आहे. आपल्या आत असलेल्या माणसाकडे आहे.
तुमच्यातलाच एक ,
माणूस
Prathamesh Patil
Prathamesh Patil is an Actor & Writer from Aurangabad and has been doing theatre from last four years. He was part of ten one act plays along with writing and direction.
The post पत्र – 4 appeared first on Clubture.
पत्र – 3
प्रिय अनय,
मला माहीत आहे, तुझ्या कामाच्या गडबडीत इनबॉक्समध्ये माझं पत्र येऊन धडकल्यावर तू दुर्लक्ष करशील. मग तुझ्या डोक्यात, पत्रात काय असेल बरं? हा विचार घोळत राहील आणि मग कितीही टाळायचा प्रयत्न केलास ना तरी तू तुझ्या ईमेलच्या इनबॉक्समधून हे पत्र उघडशील आणि वाचशील.
लहानपणापासून ते आतापर्यंत मी पहिल्यांदाच तुझ्या विरोधात गेले म्हणून तुला माझा राग येणं साहजिकच आहे.
ए, तुला आठवतंय, मागच्या वर्षी खूप स्टाईलमध्ये एक डायलॉग तू सारखा म्हणायचास. ‘शेती इकायची नसते ओ, राखायची असते’. मुळशी पॅटर्न चित्रपटातला. अगदी फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहायला घेऊन गेला होतास ना सगळ्यांना. तरडेंचा हार्ड कोअर फॅन आहेस ना तू? मग त्यांना किती वाईट वाटेल, आपल्या एका फॅनने वैतागून शेती विकली हे कळल्यावर? ह्यासाठीच चित्रपट केला होता का त्यांनी? मग तू हा चित्रपट पाहून काय शिकलास? आता हे वाचताना, मी कोणतेही connections कुठेही लावते असं म्हणत तू मनातल्या मनात मला काय बोलत असशील हे मला चांगलेच ठाऊक आहे. तुला सांगू, आपल्या कृषीप्रधान देशाचं सगळ्यात जास्त वाटोळं झालं असेल तर भाऊबंदकी आणि बांधावरच्या भांडणामुळेच. म्हणूनच हे शेती करणं जास्त कॉम्प्लिकेटेड वाटू लागतं. अस्मानी संकटावर technology मुळे एकवेळ मात करायला जमेलही कदाचित आपल्याला. तुझ्या-माझ्यासारख्या असंख्य शहरी, निमशहरी भागात राहणाऱ्या उच्च शिक्षित तरुणांच्या जमिनीचे तुकडे तसेच पडून राहतात. ह्यामुळे तू एकटा असा त्रास सहन करणारा नाहियेस बरं.
आता अनुपचं बघ ना. त्याच्या शेतातली मोटर दर दोन महिन्यांनी चोरीला जाते, कधी पाईपलाईन तोडली जाते, कधी शेतात काही गडबड होते. अगदी त्याचा बागायत भाग असला तरीही. कारण तो तिथे राहत नाही. आता शेतात जेव्हा चोरी होते, तेव्हा चोरी करणारा हा ओळखीतलाच असतो आणि कोण असतो हेही माहीत असतं; पण एक छुपी दहशत असते ना. ह्या शेतीच्या महाभारतासाठी एक नवी गीता रचली जाण्याची आवश्यकता आहे.
त्या अहिल्याची situation वेगळी आहे. तिच्या बाबांच्या डोक्यात एकाने भरवलं आहे, तिचं लग्न झालं की शेती विकून टाका. कुठे ही कटकट सहन करता. काही जण असा सल्ला देतात. तिचे बाबा तयारही झाले आणि मग रोजरोज अहिल्यासाठी स्थळं येऊ लागली. पण बी. एस्सी. ऍग्री झालेल्या, पाना-फुलात रमलेल्या अहिल्याच्या डोक्यात कसली सनक भरली असेल हे तुला वेगळं सांगायला नकोच! पण ती खमकी आहे म्हणून तिचा निभाव लागू शकतो.
रोह्याने रुबाबात फार्म हाऊस बांधलं. पण फार्महाऊसपर्यंत जाण्याची वाटच अडवून ठेवली आहे त्याची.
तेथील काही लोकांनी त्याच्या गड्यांना पळवूनही लावलं.
अतुलला काही प्रॉब्लेम नाही तसा. पण त्यांच्याइथे दुष्काळ आहे ना म्हणून जमीन असूनपण काहीच उपयोग नाही आणि त्यात सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा म्हणजे सारखा पाठपुरावा करायचा.
त्यातून अलीकडे झाडांवर केमिकलचा मारा इतका होतो की जमिनी कसण्यालायक राहतच नाहीत. त्यातून गावाजवळ एम.आय.डी.सी. असेल तर विचारूच नको! प्रदूषणामुळे पाणी पिण्यालायक राहत नाही, अगदी विहिरी मधलेपण. म्हणून टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. आजूबाजूला भरपूर पाणी उपलब्ध असूनपण ते आपण पिऊ शकत नाही, ह्यापेक्षा मोठं दुःख नाही.
मला ठाऊक आहे, तुझं ठरलंय. सध्या तू आर्थिकपणे कितीही स्थिर असलास तरी तू तुझ्या शेतात जाऊ शकत नाहीस. तिथल्या राजकारणामुळे तुला फिरकायचंही नाहीये तिथे. पण तू शेती विकलीस तर कदाचित तुला, नाही तुला नाही, तुझ्या मुलांना गावच राहणार नाही. त्यांना कळणारच नाही वाऱ्याची झुळूक काय असते, आभाळाचं छत काय असतं आणि कष्ट काय असतात. कष्ट जरी करावे नाही लागले तरी डोळ्यांनी पाहिल्येल्या आपल्या माणसांच्या कष्टाची जाणीव आपल्याला असते असं मला वाटतं.
आपल्याला काका, अण्णा, दादा, अक्का अशा अनेक निर्मळ मनाच्या माणसांचं प्रेम मिळालं. कदाचित त्यांना आई-बाबांव्यतिरिक्त कोणी निस्वार्थ जीव लावू शकतं हेदेखील कळणार नाही. तुझ्या आजूबाजूलाच बघ ना. ह्या चकचकीत माणसांच्यात किती खुजेपण आहे. माईंड युअर ऑन बिझिनेसच्या जगात मोकळ्या मनाची आणि एकमेकांसाठी असणारी माणसं कशी तयार होणार? आणि हो आपली ओळख ही आपल्या गावामुळेच जास्त आहे अजूनही, नाही का? माझंच बघ ना, माझी आज्जी ज्या पद्धतीचं मराठी बोलायची, ज्या गोष्टी सांगायची, मला तशी मराठी इथे लहानपणापासून शहरात वाढल्यामुळे बोलायला अजिबात जमत नाही. अगदी तिने तोंडी सांगितलेल्या पाककृतींमध्येदेखील खूप वेगळेपण असायचं. म्हणजे आपण नकळत संस्कृती सोबत भाषासुद्धा नष्ट करत आहोत.
शेती म्हणजे फक्त जमिनीचा तुकडा नसतो रे.कित्येक पिढ्यांनी घाम गाळलेला असतो तिच्यात. तो घाम त्या मातीत मिसळलेला असतो. आणि अप्रत्यक्षपणे
आपले पूर्वज आपल्या सोबतच असतात, ही कल्पनाच खूप भन्नाट आहे ना!
आता हळूहळू तुला माझ्या गोष्टी पटत असतील. पण तू पाशीच अडला असशील, ठाऊक आहे मला.
‘सध्या लॉकडाऊन आहे’, हे ऐकूनपण तुला जाम कंटाळा आला असेल. सगळं सुरुळीत कधी होईल हे तुला-मला कोणालाच नीट माहीत नाही. त्यातून आपल्याला आत्मनिर्भर होण्याचे धडे दिले आहेत ना. आता हे रिकामे जमिनीचे तुकडे वापरायला काढलेच पाहिजेत. आपल्या देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी देशी वस्तू विकत घ्याव्या लागणार. मग आपला त्याला हातभार लागायला नको का? तू मल्टिनॅशनल कंपनीमध्ये काम करत असला, तरी त्याचा मालक कधीतरी त्याचा मालकी हक्क दाखवणारच! ती कंपनी आपली समजून काम केलं तरीही. म्हणून जे आपल्याला मालकीचं, हक्काचं, ते शाबूत ठेवावं माणसाने, हे माझं मत झालं. हल्ली शेतीतपण अनेक नवे ट्रेंड्स सुरू झाले आहेत. जसं की रेंटवर शेती देणं. बरेच ग्रीन हाऊस आपण पाहतो, ते रेंटवरचं असतात आणि कोकणात तर पावसाळ्यात भात लागवड करायला जाणे हे देखील ट्रेंडिंग आहे. अगदी दरवर्षीच्या हुरडा पार्टीसारखं. बट ऑन अ सिरीयस नोट,सगळीच अर्थव्यवस्था कोलमडली आहे. शेतमालालाही भाव नाही. अशा स्थितीत जे गरीब शेतकरी आहेत त्यांच्याकडे पेरणी करायला पैसे कुठून येणार? म्हणजे साहजिकच वस्तूंचा तुटवडा जाणवणार. अशा स्थितीत आपणच काही युक्ती करायला हवी, जेणेकरून जमिनेचे रिकामे तुकडेही हिरवेगार होतील. पटतंय ना? मला ठाऊक आहे, तुला माझं बोलणं पटत असणार. चल तर मग सुरुवात करू आपला भारत खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम् करण्यासाठी. मनातल्या मनात “लेट मी थिंक” असं तू म्हणत असशील. चल… बाय मी पत्र संपवते. वेळ भेटल्यावर तू ह्या पत्राचे उत्तर देशील हे देखील मला माहीत आहे. काळजी घे
तुझी मैत्रीण,
श्रद्धा सुभाष जगदाळे.
Shraddha Jagdale
Shraddha Jagdale is a website content writer from Pune. She has tried her hands on various kinds of contents from press releases to advertisements. Her press articles have been published in reputed magazine’s like Forbes. She is keen to explore, research & learn new things. Having an engineering background Shraddha tries to blend science and arts together. Her articles, interviews, poems, stories & reviews have been published in various magazines. She is founder of ‘Grounded’ a website created with an intend of appreciating people.
The post पत्र – 3 appeared first on Clubture.
पत्र – 2
Letter to younger self
Dear Younger Self,
This is the first time I’m writing to you. Perhaps, it’s a proper time to write to you. This coming October you will be completing 25 years of your insane journey. Somehow you have managed it, yet, and you have a very long way to go at my friend. But, while finishing the 1/4th of a journey, there are few things you’d like to hear. You might be confused, puzzled and curious to know, how did it go? Is it worth? Etc. I will stop you right there, weaving confusions, stop thinking. Just take a breath and hear it out, and I quote,”YOU DID WELL.”
Yes! You read it right.
So, let’s get this straight. I’m penning this to eradicate all your bewilderment and to consult you. First of all, the decision of leaving the engineering and aiming for a career in creativity and art was audacious. You would be proud of what you have achieved so far. You have a degree in your preferred subject and a career under your belt.
Secondly, do not worry about the relationships. I know you are young and carefree. But accept it. Acknowledge the person involved in it. They will give you emotional lessons. They will help you grow and motivate you.
Thirdly, do not stress out on things too much. Keep it simple. You are running on the right track with a decent speed. For starters, value your time, be kind to yourself. Have faith in your decisions, eventually they turned out to be the best. Be more generous to people around you. Lastly, have patience, and you will know that, everything happens for a reason. Just that, please use your time in learning few things like swimming, or something related to music, the only complaint I have from you.
Finally yet importantly, you are an ambitious person. To meet your goals, you will travel places. But don’t let it be the reason of distancing from our parents, I’m telling you from my personal experience, you will need them the most.
That’s the 1/4th of a cycle. And I vow, the remaining series of events will shine good and bright. Spoiler alert: You will celebrate your 25th birthday in style. A bunch of wonderful people surrounds you. You literally got your magic beans. Trust me, you are good at saving money too. To close, always remember, diet is a myth. Don’t stop eating. For me. For you. For us.
Your elder version
Piyush
Piyush is a Pune based Content/Creative writer. A creator at a day and reader in the night. He has a knack for storytelling & is a part-time travel aficionado, foodie and a full time cinephile. He has written for various digital platforms over the years. He’s a learner and love to create content for the people.
The post पत्र – 2 appeared first on Clubture.
पत्र – 1
तुला पत्र लिहायचं म्हणजे फार अवघड आहे. तुला या पत्राच्या साच्यात माववू तरी कसं ? तुला काय म्हणू ? प्रिय कोण ? खरंतर ‘प्रिय’ च कसं म्हणू तुला मी ? म्हणून अशीच सुरुवात करतेय.
तू,
गेले बरेच दिवस मला तुझ्याशी ‘बोलावसं’ वाटतंय. तुझ्या लाटांच्या आवाजात ‘डुंबावं’ असं वाटतंय. तुझ्यात खोल शिरून तुला ‘पहावसं’ वाटतंय. पण जितकं खोल शिरावं तितका अजूनच गहिरा होत चालला आहेस तू, आणि ते गहिरेपण मला सोसवणारं नाहीये. पण तरीही मी तुझ्या आणखीनच खोलात शिरत गेलेय.
पण आज एवढं पत्र लिहिण्यासाठी मात्र तुझ्याच किनाऱ्यावर, तुझ्यावरून येणारा खारा वारा हुंगत पडलेय. तुझ्यात बुडून गेल्यावर न येणारा तुझ्या लाटांचा आवाज कानात भरून घेतेय. हल्ली तुला असं फक्त बाहेरून बघणं जमत नाही. तरंगणाऱ्या हलक्या निळ्या रंगातून तुझं गहिरं निळेपण सरपटत वर येताना दिसतं, लाटांच्या आवाजात तुझ्या खाली दबलेली अथांग शांतता उसळून येते, आणि वाळूवरच्या गोंडस शंख-शिंपल्यांमधून भास होतो तुझ्या काळ्या पोटात चिडीचूप वावरणाऱ्या त्या अजस्त्र हिडीस— बास !
तुझ्याशी बोलायचं असेल तर असं हरवून जाऊन चालणार नाही.
अगदी सुरुवातीपासूनच सुरुवात करुया ?
आपण स्वप्नात भेटायचो ना बरेचदा ? आधी दचकून उठायचे मी. पण मग एका रात्री…
मी एका प्रचंड दगडी किल्ल्यात बंदिस्त आहे. तू वेढून टाकलंयस जिथपर्यंत नजर जातेय, आणि त्याही पलीकडे ! वरून पाऊस कोसळतोय आणि तुला अजूनच चेव चढतोय. पण तू बंदिस्त माझ्यावर अचानक हल्ला चढवत नाहीस, तुला शक्य असूनही ! हळूहळू एकेका लाटेला पुढे करत माझ्यावरती अतिक्रमण करतोस. संपूर्णपणे ! इतकं की मला स्वप्नातून जागंही नाही होता येत.
हरकत नाही ! आता मी प्रतिकार करणंच सोडलंय. पण प्रश्न मात्र पडतात…
इतक्या अनादि काळापासून मला तुझ्याबद्दल इतकं काही कसं वाटतं ? आणि तुझ्याचबद्दल का वाटतं ? तुझ्या अनोळखीपणाचं आकर्षण ? तुझ्या विक्राळपणाची भीती ? तुझ्या अखंड गाजेमुळे येणारी अस्वस्थता ? हे आकर्षण, भीती, अस्वस्थता, तर बऱ्याच गोष्टींत भरून राहिलीये… अंतराळ, जंगल, न दिसणारी अतिसूक्ष्म जीवसृष्टी, न कळणारे अतिमानवी संकेत… मग तुझ्यात असं काय वेगळंय ? तूच का ? कशासाठी ?
कधी माहितीये ? माझ्या स्वप्नात येऊन मला पूर्णपणे काबीज करायचं ठरवलंस, त्याच क्षणी ! तुला वाटलं किल्ला पाण्याने पूर्ण भरला की तू जिंकलास, मी तुझी झाले, तुला तुझा अंश परत मिळाला. पण तू एक विसरलास. तो किल्ला माझा होता. मी निर्माण केलेला. या तटबंदीत शिरलास आणि माझा झालास. किल्ल्यात मी नाही, तू बंदिस्त झालास.
माझ्याबरोबर तुझी शाश्वती संपली.
आता तितकं पुरातन राहणं जमणार नाही तुला.
प्रतिकार करणं सोडून दे.
तुझीच,
मी.
Saee Limaye
Saee Limaye is a Writer, Actor and Poet from Sir Parshurambhau College Pune. She has been part of ‘KavyaWachan’ in Wachanotsav episode 1.
The post पत्र – 1 appeared first on Clubture.