प्रिय टिव्ही,
खूप दिवसांपासून तुला एक गोष्ट सांगयची होती,माझं तुझ्यावर पूर्वी सारखं प्रेम उरलेलं नाहीये आणि याचं कारण माझ्या आयुष्यात आता दुसरं कोणीतरी आलेलं आहे.मला माहित आहे तुला माझ्या पासून दूर जायची इच्छा नाहीये, पण मला आता जावं लागेल पण आपल्या आठवणी नेहमी माझ्या जवळ राहतील. मला आठवतंय आपल्या नात्याची सुरुवात दूरदर्शन पासून झाली होती.आपला जुनियर जि, आपले चालता बोलता, आपले विक्रम वेताळ, आपला शक्तिमान,आपले शनिवार रविवारचे सिनेमे मला अजूनही आठवतात.मग आपल्या नात्याला वळण आले ते केबलमुळे, दूरदर्शन सोडून बरेच चॅनल्स बघायला मिळू लागले, त्या काळात माझं तुझ्यावरचं प्रेम अधिकच वाढलं होतं.आपल्या अडचणीच्या काळात डीव्हीडी प्लेयरने पण खूप मदत केली, कधी भाड्याने कधी विकत घेतलेल्या डीव्हीडी मला अजूनही आठवत आहेत.त्या वेळी केलेल्या कष्टात आणि काटकसरीत सुद्धा एक वेगळाच आनंद होता.याचं कारण आपण एकत्र होतो, आपल्या नात्यातला सर्वात सुंदर काळ म्हणजे जेव्हा तुला Tata sky ची जोड मिळाली आणि आपल्या नात्यात कशाचीच उणीव भासली नाही.दिवस रात्र मी तुझ्याबरोबर घालवू लागलो,आई वडिलांचा विरोध होता आपल्या नात्याला तरी सुद्धा मी तुझ्याशी नातं टिकवायचं मनाशी पक्क केलं होतं, पण या सगळ्यात मला एक गोष्ट जाणवली ते म्हणजे तू माझ्या आवडीनिवडीचा कधीच विचार केला नाहीस आणि मग माझ्या आयुष्यात नेटफ्लिक्स आली. मला काय हवं नको याची सगळी माहिती आहे नेटफ्लिक्सला.आमचं प्रेम वन साईडेड नाहीये, जेवढा विचार मी नेटफ्लिक्सचा करतो तेवढाच विचार नेटफ्लिक्स माझा करते,माझ्या आवडीच्या गोष्टींचा रेकॉर्ड ती ठेवते. Money heist, stranger Things , Narcos मला हवं तेव्हा हवं तिथून बघायला मिळतं.जेवढा यूजर फ्रेंडलीनेस आमच्या नात्यात आहे तेवढा आपल्या नात्यात कधीच येऊ शकला नसता.पण एक मात्र नक्की आपल्या सगळ्या आठवणी मी जपून ठेवलेल्या आहेत आणि त्या माझ्यासाठी नेहमीच प्रियं असतील.शक्य असल्यास मला माफ कर.
तुझाच,
एक व्ह्यअर.