डियर पुस्तक,
बरंच काही बोलायचं असतं पण राहूनच जातं. तुझ्याशी संवाद साधता साधता तुझ्यात कधी गुंतून जातो कळतच नाही. खरं तर आपलं नातं गुंफल्या जाईल हे मला कधीच वाटलं नव्हतं. कारण शाळेत असताना एक उद्दाम आणि ढं विद्यार्थी इतकीच माझी ओळख होती आणि आपला दोघांचा संबंध फक्त परीक्षे पुरता. कारण ती लढाई जिंकायला तुझ्या शब्दांची खड्ग आणि ढाल आवश्यक होती, नाही तर कदाचित तितकाही आला नसता.
तुला सांगतो नियती आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवेल काहीही संगत येत नाही, आणि नियतीने ठरवलं होतं आपलं नातं गुंफायचं. २००७ – २००९ दुर्दैवाने मी प्रचंड आजारी पडलो आणि २४ तास पलंगावर पडून राहण्याची वेळ आली. टीव्हीत सुद्धा मन रमेना औषध आणि झोप – झोप आणि औषध माझं हेच सुरू होतं. २००९ साली डॉक्टरांनी सल्ला दिला कि तब्बेतील हवा पालटाची आवश्यकता आहे. मग उत्तम ठिकाण म्हणून मावशी कडे नाशिक ला राहायला गेलो. तिथेही तोच दिनक्रम सुरू होता. १८ वं वर्षं लागलं होतं म्हणून काकांनी त्यांच्या संग्रहातली “दुनियादारी” लेखक सुहास शिरवळकरांची कादंबरी वाचायला दिली आणि तंबी दिली कि एका बैठकीत वाच मग आपण त्यावर चर्चा करू. मुबलक वेळ आणि तो वेळ घालवायला मिळालेली टास्क म्हणून जड अंतःकरणाने वाचायला सुरवात केली सुरवातीची १० – १५ पानं तर मलाच सुचेना मी काय करतोय, पान हळू हळू रामयला लागलो आणि सकाळी १० ला सुरू केलेली पहिली कादंबरी रात्री १ वाजता संपली, आणि तू झपाटलच अगदी मला. दुसऱ्याच दिवशी “कुसुमाग्रज स्मारक” वाचनालायात गेलो कुठल्याही लेखकाची ओळख नाही, काय वाचवं याची सुद्धा माहिती नसताना समोर दिसेल ते पुस्तक वाचत गेलो. मग त्यात पू. ल., बाबा कदम, मर्ढेकर, आगरकर, रानसिंग, इत्यादि बऱ्याच लेखकांची पुस्तकं वाचायला मिळाली. जवळ जवळ ७० – ८० पुस्तकं परतीच्या दिवसा पर्यंत वाचली. खरं तर तेव्हा मला माझी नवीन सुरवात सापडली, खरं तर तू आरसा आहेस प्रत्येकाचा जो माणूस तुझ्या पुढे उभा राहून स्वतःचा शोध घेईल त्या प्रत्येकाचा मार्ग दाखवणारं आयुष्याला दिशा देणारं ते होका यंत्र ते मला तेव्हा गावसलं. आपल्यात झालेली टी नात्याची गुंफण आता इतकी घट्ट झालीये कि जितकी श्वासची गरज असते तितकीच वाचनाची सुद्धा गरज वाटायला लागली आहे. पान फक्त गरज म्हणून नाही तर तू मझा प्रत्येक क्षणाचा सोबती आहेस.
पण तुला वचात असताना मी कधीच विषयाची मर्यादा स्वतःला घातली नाही जे समोर येईल ते माझं म्हणून वाचत गेलो आणि “चांगलं पुस्तक” शोधणाऱ्या प्रत्येकाला मी एकच संगत गेलो कि चांगलं किंवा वाईट पुस्तक कधीच नसतं. कारण पुस्तकांना कायमच देण्याचं वरदान आहे आपली घेण्याची कुवत कदाचित त्याला चांगलं वाईट ठरवत असावी.
कळावे….

तुझाच
- गौरव खोंड

Adv. Gaurav Khond

Adv. Gaurav Khond stays in Nagpur and has been working from last 15 years in the field of Dramatics. He has written 7 One Act Plays, 400+ poems and his write-ups have been published in ‘ Tarun Bharat ‘ , ‘ Lokshahi ‘ Newspapers. While he has also acted in 20+ Dramas and One Act Plays. He has been honoured by ‘ Vidarbha Sahitya Sammelan ‘ & ‘ Natya Parishad Mumbai ‘ for his immense work in field of Drama.