Hi अन्या,
सॉरी यार late झाला. आम्ही आपली स्नेहल अपार्टमेंट सोडली आणि नंतर आपला फार काही contact उरला नाही. खर तर मी स्वतःहुन काही प्रमाणात contact कमी केला. नाटक नाटकातले मित्र या सगळ्यात तुझा विसर पडला मला. आणि खर तर नंतर तू लांब गेलाय याची जाणीव सुद्धा लांब गेली. तू आवर्जून लग्नाला बोलावलं मला जमलं नाही. स्वतःच्या लग्नात बोलवायचं राहिलं. मला तुझ्यामुळे college life समजली. तुझ्यासोबत दुर्गा zest mac d ची सवय लागली. मला अजूनही आठवतंय आपली cold coffee ची स्पर्धा. अश्या नाही म्हणायला आयुष्यातील कित्येक गोष्टी आपण एकत्र जगलो. तुझे family problem मला माहित होते, माझ्या love life चे problem तुला माहीत होते. भरकटण्याच्या वयात मी तुझ्या सोबत असल्याने फार भरकटलो नाही. तुझं क्रिकेट वरच प्रेम आपण एकत्र खेळलेलो parking मधल cricket या सगळ्या गोष्टी आता फक्त स्मृती झाल्या आहेत. साला काय आयुष्य होऊन जातं कधी कधी कोणत्याच गोष्टीचा फरक पडेनासा होतो. तुझा contact delete झाला नाही पण लक्षात ठेवून फोन करायचं मात्र राहून गेलं. काका गेल्याच तर मला कळलं नाही. जेंव्हा यशस्वीताचा फोन आला तेंव्हा कळालं आता तू ही नाहीस. तुला कॅन्सर झालेला हेच मला माहित नव्हतं. इतकं तर आपण दूर गेलो नव्हतो रे. नव्या मित्रांच्या नादात जुने मागे सुटले. कित्येकदा तुझ्या घरावरून गेलो पण साला हाक दिली नाही मी. आता ओरडून काय उपयोग. म्हणून म्हटलं अन्या साला late झाला. मी मुद्दाम नाही केलं.. राहून गेलं एवढं मात्र खरं.. सॉरी..
तुझाच
अक्षय

 

Akshay Joshi

Akshay Joshi is a freelance Writer and Actor. He has worked as an actor in Critics acclaimed film ‘Bhai’. He has written for reality shows like Dance Maharashtra Dance, Super Dancer Maharashtra, Maharashtracha Favorite Dancer, Ek Tappa Out and many more. He has written plays like ‘Dil to Bachcha hai ji

 

Join our Writer’s Community on WhatsApp Group and get connected to all the Writers.

https://chat.whatsapp.com/IG6s4w2ApPk02xLylR1P8A