प्रिय,
आम्ही माणसं, पत्र हे नेहमी माणसांनाच लिहितो. म्हणजे कोणे एके काळी लिहायचो. मग ते साधे postcard असो, आंतरदेशीय असो किंवा ३/४ पानांचे पत्र असो. पण ते पत्र लिहिणे- ते पोस्टाच्या पेटीत टाकणे किंवा आपल्यासाठी कोणीतरी लिहिलेले पत्र postman ने आणणे आणि उत्सुकतेने ते पत्र हातात घेऊन वाचणे सगळीच मजा असायची. पण या सगळ्याच गोष्टी आणि क्रिया थोड्याफार कालबाह्य झाल्या आहेत.
पण आज मी मुद्दाम तुला पत्र लिहितो आहे, कारण ….कारण तू माझी सखी, साथी, मैत्रीण, सहकारी सगळं सगळं काही आहेस. तु माझ्याबरोबर नसलीस ना की मी काही कामच करू शकत नाही. तुझी आता मला इतकी सवय झाली आहे की तुझ्या शिवाय जगण्याची कल्पना पण मला सहन होत नाही. खरं सांगू, तू जवळ नसलीस की मी अस्वस्थ होतो. तुला जवळ केल्याशिवाय माझा दिवस संपतच नाही.
अर्थात तुला कधीतरी दुखणार-खुपणार हे मला मान्य आहे , पण मला तुझा तेवढं सुद्धा विरह सहन होत नाही. तु दुसऱ्या कोणाबरोबर गेलेली मला अजिबात चालत नाही. मी तुझ्या बाबतीत जरा जास्तच possasive आहे. कारण तुझ्यावर फक्त माझा आणि माझाच अधिकार आहे. पण तु माझ्या बरोबर यायला कधीच नाही म्हणत नाहीस. कितीही थंडी, उन्हाळा, पावसाळा असो तू कायम माझ्या बरोबर असतेसच. कधी कधी मला तुझी कीव पण येते. तसे माझे वजन बरेच आहे, पण तुझी कधीच काहीही कुरकुर नसते.
माझ्या चांगले लक्षात आहे तो दिवस, तुला बघुन मी वेडा झालो होतो. मला जागेपणी आणि स्वप्नात पण तुच दिसायचीस. मी तुझ्या प्रेमात फक्त पडलो नव्हतो तर आकंठ बुडालो होतो. मग मुहूर्त काढून तुला घरी आणायचे ठरवले. त्या दिवशी तू तिथे तुझ्या मैत्रीणींबरोबर उभी होतीस. पण मला फक्त तू आणि तुच दिसत होतीस. मी सगळ्यांसमोर तुझ्या जवळ आलो आणि तुला स्पर्श केला. मी अक्षरशः रोमांचित झालो ग.
त्या दिवसापासून तू माझी झालीस, आवश्यक त्या सगळ्या कायदेशीर गोष्टी, कागदपत्रं पूर्ण करून मी तुला घरी आणले. माझ्या सगळ्या मित्रांना तुला बघायचे होते. माझ्या घरी सगळे जमले होते, माझ्या बिल्डिंग मधले सगळे तुझे स्वागत करायला तयार होते. सगळ्यांचे तोंड गोड केलं मी. Building च्या दारातच तुझे औक्षण केले. तुझ्या गळ्यात हार घातला आणि तु सगळ्यांच्या साक्षीने माझी झालीस.
हो माझी…..माझी दोनचाकी …..स्कुटी
भावना व्यक्त करायला शब्द असावे लागतात आणि आपण आपली भावना स्कूटी बद्दल अतिशय उत्तम रित्या व्यक्त केलीत. आपल्या प्रत्येक वस्तूला आपण कायमच जिव्हाळ्याने ठेवतो आणि जपतो स्वतः पेक्षा जास्त. आपण खूप उत्तम व्यक्त केल्यात आपल्या भावना.
धन्यवाद.
तुम्ही आपल्या व्हॉट्सऍप ग्रुप ला देखील Join होऊ शकता.
https://chat.whatsapp.com/IG6s4w2ApPk02xLylR1P8A
मस्त
धन्यवाद.
तुम्ही आपल्या व्हॉट्सऍप ग्रुप ला देखील Join होऊ शकता.
https://chat.whatsapp.com/IG6s4w2ApPk02xLylR1P8A